Friday, February 13, 2026
Homeकोल्हापूरई-सेवा आयोजित रक्तदान शिबीरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान

ई-सेवा आयोजित रक्तदान शिबीरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान

कोल्हापूर इलेक्ट्रिकल सेल्स एम्प्लॉइज वेलफेअर असोसिएशन, कोल्हापूर (ई-सेवा) आयोजित आणि संजीवन ब्लड सेंटर यांच्या सौजन्याने रविवार दिनांक २० मार्च २०२२ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरामध्ये ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबीरासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष मा. श्री. संजय शेटे साहेब, सचिव मा. श्री. धनंजय दुगे साहेब, इलेक्ट्रिकल व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष मा. श्री. अजित कोठारी साहेब, उपाध्यक्ष मा. श्री. महेंद्रभाई पोरवाल साहेब, महालक्ष्मी फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश उरसाल साहेब यांनी उपस्थिती लावली होती.

शिबीरामध्ये ई-सेवा सभासद, संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी आणि मित्र मंडळींनी रक्तदान केले. तसेच महीला रक्तदात्या ही उत्स्फूर्तपणे शिबीरामध्ये सहभागी झाल्या होत्या.

इलेक्ट्रिकल सेल्स एम्प्लॉइज वेलफेअर असोसिएशन, (ई-सेवा) कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. यापूर्वी कोल्हापूर महापालिकेच्या आवाहनाला साद देत शेणी-दान हा सामाजिक उपक्रम राबविला होता.

रक्तदान शिबीरासाठी ई-सेवा अध्यक्ष किरण दीक्षित, उपाध्यक्ष निखिल पोवार, सचिव किशोर गुरव, खजिनदार संदीप बनसोडे, संचालक संदीप पोवार, युवराज बोडके, विवेक चौगुले, विवेक जाधव, महादेव चौगुले, स्वप्निल चौगुले, अनिकेत भोसले, नामदेव कोळेकर, गुरुप्रसाद माळकर, अनिरुद्ध सोळांकुरकर, माजी संचालक सतीश चौगुले, राजाराम कांबळे, विजय भोपळे आणि सभासदांचे योगदान लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -