येथील शेती उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील पहिली हापूस आंब्याची आवक झाली. दस्तगीर बागवान यांच्या दुकानात तमिळनाडू येथून हापूस आंब्याचे ४० पेट्या आवक झाली (Kolhapur Hapus mango price per dozen) आहे.
हंगामाच्या सुरुवातीलाच झालेल्या या आवकेला चांगली मागणी असून, प्रसाद वळंजू यांनी १२ नग (एक डझन) असलेला बॉक्स २५०० रुपये दराने खरेदी केला आहे.
कोकणातून नेलेल्या रोपांपासून तमिळनाडूमध्ये आंब्याचे उत्पादन घेतले आहे. तेथील अनुकूल वातावरणाचा फायदा झाल्याने हापूस आंब्याची ही आवक शक्य झाल्याचे श्री. वळंजू यांनी सांगितले.दरम्यान, हापूसच्या पहिल्या आवकेमुळे बाजारपेठेत आंब्याच्या हंगामाबाबत उत्सुकता वाढली आहे. आगामी काळात आवक वाढल्यानंतर दरात काय बदल होतात आणि ग्राहकांकडून किती प्रतिसाद मिळतो, याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
