Homeकोल्हापूरअंबाबाई चरणी 20 लाखांचे सोने, 44 लाखांची चांदी; नवरात्रोत्सवात भाविकांकडून भरभरून दान,...

अंबाबाई चरणी 20 लाखांचे सोने, 44 लाखांची चांदी; नवरात्रोत्सवात भाविकांकडून भरभरून दान, 36 लाखांवर रक्कमही खजिन्यात

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत २० लाख ३० हजार २२३ रुपये किमतीचे १३० ग्रॅम ३०५ मिली सोने दान केले आहे. तर ४४ लाख ३८ हजार ४६७ रुपये किमतीची १६ किलो २८३ ग्रॅम ६२० मिली चांदीही भाविकांनी देवीच्या चरणी अर्पण केली (Ambabai Temple gold donation during Navratri) आहे.

 

याशिवाय थेट देणगीच्या स्वरूपात ३६ लाख ७५ हजार ५९४ रुपयांची रोख व ऑनलाईन रोकड देवीच्या खजिन्यात जमा झाली आहे.

 

देश-विदेशातून आलेल्या भाविकांनी देवीला सोन्या-चांदीचे अलंकार आणि रोख गुप्तदान मोठ्या प्रमाणात अर्पण केले आहे. नवरात्रोत्सव काळात देवीच्या चरणी अर्पण केलेल्या सोने, चांदी, गुप्तदान, भाविकांनी ऑनलाईन घेतलेले दर्शन याची माहिती आज देवस्थान समितीने जाहीर केली. दरम्यान, ही रक्कम केवळ रोख आणि ऑनलाईन क्यूआर कोड स्कॅनरद्वारे जमा झाली असून, मंदिरातील मुख्य दानपेट्यांची मोजणी अद्याप बाकी आहे.

 

लाडू आणि साड्यांच्या विक्रीतून विक्रमी महसूल

 

अंबाबाईचा प्रसाद म्हणून भाविकांची पहिली पसंती असणाऱ्या लाडूंच्या विक्रीने यंदा नवा उच्चांक गाठला. १० दिवसांत तब्बल १ लाख ३७ हजार ६८९ लाडूंची विक्री झाली असून, त्यातून २० लाख ६५ हजार ३३५ रुपये जमा झाले. तसेच, भाविकांनी अर्पण केलेल्या साड्यांच्या लिलाव व विक्रीतून २ लाख ७० हजार ५४० रुपये तसेच अगरबत्ती विक्रीतून ४ लाख ४३ हजार २०० रुपये, तर २ हजार २१३ कॅलेंडर्सच्या विक्रीतून १ लाख ३२ हजार ७९५ रुपयांचा महसूल देवस्थान समितीला मिळाला आहे.

 

४ लाख ५३ हजार भाविकांनी घेतले ऑनलाईन दर्शन

यंदाच्या उत्सवात ऑनलाईन दर्शनाला भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. देवस्थानच्या अधिकृत वेबसाईटला तब्बल ४ लाख ५३ हजार नेटकऱ्यांनी भेट दिली. तर घरात बसून इंटरनेटच्या माध्यमातून अंबाबाईचे थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या ‘लाईव्ह दर्शन’ भाविकांची संख्या २ लाख २३ हजार नोंदवली गेली.

 

मुख्य मोजणी अजून बाकी

 

देवस्थान समितीने स्पष्ट केले आहे की, आतापर्यंत जाहीर झालेली कोट्यवधींची आकडेवारी ही केवळ वेगवेगळ्या काउंटरवर जमा झालेली रोख आणि डिजिटल पेमेंटची आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील आणि परिसरातील मुख्य दानपेट्या अजून उघडायच्या आहेत. या दानपेट्यांची अधिकृत मोजणी पूर्ण झाल्यानंतर हा एकूण दानाचा आकडा आणखी कितीतरी पटीने वाढण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -