Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगदहावीचा पेपर दिल्यावर पाच मित्र शेततळ्यात पोहायला गेले, अन्…

दहावीचा पेपर दिल्यावर पाच मित्र शेततळ्यात पोहायला गेले, अन्…

औरंगाबाद  जिल्ह्यातील अजिंठा येथील बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या अनाड रस्त्याजवळ एका शेतातील शेत तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहावी कक्षेतील तिन्ही मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यादरम्यान तर इतर दोघे थोडक्यात बचावले. काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, उमेरखान नासिरखांन पठान (16, रा.उर्दू शाळेजवळ अजिंठा), शेख मोहमद अनस हब्दुल हाफिज (16, रा.उर्दूशाळेजवळ अजिंठा) आणि अक्रमखान आयुबखान पठान (16, रा.बगीचा मज्जीत समोर अजिंठा) असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. तर, रेहान खान इरफान खान (16, रा.अजिंठा) आणि फैजानखान शफीखान (16, रा.अजिंठा) हे या घटनेतून बचावले आहेत.

ही पाच मुले काल सकाळी 10:30 वाजता अजिंठा येथील उर्दू शाळेत सायन्स सेकंडचा पेपर देण्यासाठी गेले होते. 1 वाजता त्यांनी पेपर दिला आणि दुपारी घरात काही एक न सांगता अनाड रोडवरील अजिंठा येथील सतीश चव्हाण यांच्या शेतातील तळ्यात पोहण्यासाठी उतरले. सर्व पाच मुलांना पोहता येत नव्हते मात्र ते नेहमी एका झाडाला ठिबकची नळी पकडून याच शेततळ्यात आंघोळ करत असत. मात्र आज आंघोळ करत आतांना ती नळी तुटली आणि तिघांचा बुडून अंत झाला, तर दोघे बालंबाल बचावले.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, सहायक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, अक्रम पठाण, शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली अजिंठा पोलीस ठाण्यात या प्रकरणी पोलीस पाटील यांच्या तक्रारी वरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -