Monday, December 23, 2024
Homeनोकरीतुमची बँकांची कामे उरकून घ्या! एप्रिल महिन्यात बँकांना 9 दिवस सुट्ट्या

तुमची बँकांची कामे उरकून घ्या! एप्रिल महिन्यात बँकांना 9 दिवस सुट्ट्या

तुमची बँकांची कामं राहिली असतील तर वेळ काढून ती उरकून घ्या. कारण एप्रिल महिन्यात बँकांना 9 दिवस सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला बँकांच्या कामासाठी खास नियोजन करावे लागणार आहे. नोकरदारांसाठी मात्र या महिन्यात दोन लॉंग वीकेंड आले आहेत. तर सार्वजनिक सुट्ट्या मुळे (Public Holidays) एप्रिल महिन्यात बँकेंच्या ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, वीकेंड वगळून एप्रिलमध्ये बँकांना 9 दिवस सुट्ट्या असणार आहेत. बँका बंद असलेल्या दिवसांच्या यादीत दुसरा आणि चौथा शनिवार तसंच रविवारचाही समावेश आहे.

एप्रिल मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी

1 एप्रिल – आर्थिक वर्षाचा हिशेब असल्यामुळे बँका सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद राहतील

2 एप्रिल – गुढी पाडवा हा हिंदू समाजाचा मोठा सण असल्यामुळे महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टीमुळे बँका बंद राहतील. तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात उगाडी सणानिमित्त बँकांना सुट्टी आहे.

3 एप्रिल – रविवार असल्यामुळे बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात सुरुवातीचे तीन दिवस बँक बंद राहतील.

9 एप्रिल – दुसरा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी

10 एप्रिल – रविवार असल्यामुळे बँकांना 9 आणि 10 एप्रिल रोजी सलग सुट्टी असेल.

14 एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, वसंत पंचमी, बैसाखी, तामिळ नवीन वर्षानिमित्त राष्ट्रीय सुट्टी असेल.

15 एप्रिल – गुड फ्रायडेनिमित्त बँकांना सुट्टी असणार आहे.

23 एप्रिल – चौथा शनिवार असल्यामुळे बँकेला सुट्टी असेल.

24 एप्रिल – रविवार असल्यामुळे बँकेला 23 आणि 24 एप्रिल रोजी सलग दोन दिवस सुट्टी असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -