Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगCNG Rate : सलग दुसर्‍या दिवशी सीएनजी दरात वाढ

CNG Rate : सलग दुसर्‍या दिवशी सीएनजी दरात वाढ

इंधन दरवाढीचा सपाटा सुरुच असून देशाची राजधानी दिल्ली तसेच मुंबईमध्ये गुरुवारी सीएनजी वायूच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर मात्र जैसे थे ठेवले आहेत. (CNG Rate)

दिल्लीमध्ये सीएनजी वायूच्या दरात किलोमागे अडीच रुपयांची वाढ झाली आहे. गत मार्च महिन्यात सीएनजी दरात किलोमागे झालेली वाढ तब्बल साडेबारा रुपयांची आहे. ताज्या दरवाढीनंतर सीएनजीचे किलोचे दर 69.11 रुपयांवर गेले आहेत.

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडकडून (आयजीएल) दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात सीएनजी तसेच पाईप्ड घरगुती गॅसचा पुरवठा केला जातो. आयजीएलने बुधवारी सीएनजी दरात किलोमागे अडीच रुपयांची वाढ केली होती. त्यापाठोपाठ सलग दुसर्‍या दिवशी आणखी अडीच रुपयांची वाढ करण्यात आली. दुसरीकडे पीएनजीच्या दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. पीएनजीचे प्रति स्टँन्डर्ड क्युबिक मीटरचे दर 41.61 रुपये इतके आहेत.

दरम्यान मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी दरात किलोमागे सात रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीनंतर सीएनजीचे दर 67 रुपयांवर गेले आहेत. तिकडे गुजरातमध्ये गुजरात गॅस कंपनीने सीएनजी दरात किलोमागे साडेसहा रुपयांनी वाढ केली आहे. यानंतर सीएनजीचे दर 76.98 रुपयांवर गेले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -