शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर आज प्रथमच मुंबईमध्ये परतले. त्यांच्या मुंबईत परतण्याचा जंगी इव्हेंट शिवसेनेने केला. त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक, आमदार खासदार विमानतळावर दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी उघडी जीप फुलांनी सजवण्यात आली असून ढोल ताशा पथकेही बोलावण्यात आली आहेत. काही शिवसैनिकांनी शंखही सोबत आणला आहे. किरीट सोमय्यांचा घोटाळा पुराव्यानिशी बाहेर काढल्याचे ते म्हणाले.
संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईनंतर भाजप, किरीट सोमय्या आणि ईडीवर कडाडून प्रहार सुरु केला आहे. त्यांनी आता देवेंद्र फडणवीस यांनाही टार्गेट केलं आहे. दुसरीकडे काल शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ईडी कारवाईचा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगितले.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या आहेत.जय राऊत हे ज्येष्ठ पत्रकार तसेच राज्यसभेचे खासदार आहेत,याची कल्पना पंतप्रधानांना दिली.राऊतांच्या घरी केंद्रीय यंत्रणेने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. ८ ते १० एकर जमीन, फ्लॅट ताब्यात घेण्यात आले आहेत,हे पंतप्रधानांच्या निदर्शनात आणून दिल्याचे पवारांनी सांगितले.