Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगMPSCच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या नावाने लिहिली सुसाईड नोट!

MPSCच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या नावाने लिहिली सुसाईड नोट!

वर्ध्यामध्ये एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यातल्या देवळी तालुक्यात ही घटना घडली आहे. नागझरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात परिचारक म्हणून हा तरुण काम करत होता. एमपीएससीच्या परिक्षेसाठी केलेला प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे नैराश्येत येऊन या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या तरुणाने पशुवैद्यकीय दवाखान्यातील कार्यालयात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किसन ढगे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. किसन ढगे हा नागझरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या सात वर्षांपासून परिचारक पदावर कार्यरत होता. किसन मुळचा परभणीचा असून तो कामानिमित्त देवळी येथे भाड्याने राहत होता. एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करुन मोठ्या पदावर जाण्याचे त्याचे स्वप्न होते. यासाठी त्याने खूप मेहनत घेतली सतत अभ्यास करीत होता. पण परीक्षेमध्ये उत्तीर्ण न झाल्यामुळे तो नैराश्येत आला. किसनेने कार्यालयातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) आणि पंतप्रधानांच्या (PM Narendra Modi) नावाने पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये नोकरी मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे.

किसन गेल्या 10 वर्षांपासून एमपीएससीची परीक्षा देत होता पण त्याला यश येत नव्हते. यावेळी सुद्धा त्याने एमपीएससी परीक्षा दिली पण तो उत्तीर्ण झाला नाही. अशातच त्याच्या मित्रांच्या नियुक्त्या झाल्या मात्र किसनला अपयश आले. त्यामुळे तो नैराश्येत आला. किसनने सकाळी मित्रांसोबत जेवण केले आणि फोटो काढले. त्यानंतर त्याने गळपास लावून आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात असे लिहले आहे की, ‘आई-वडिलांनी शेती विकून माझ्या शिक्षणावर खर्च केला पण, अपेक्षित नोकरी मिळत नाही.’ तसंच त्याने सुसाईट नोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या घरच्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणीही केली आहे. किसन गेल्या 15 दिवसांपासून नैराश्येत होता. नोकरी मिळत नसल्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -