ताजी बातमी ऑनलाईन टीम
रॉकिंग स्टार यशचा चित्रपट KGF Chapter 2 ने प्रदर्शित होण्याच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाकडून सर्वांना अपेक्षा होती तशीच कामगिरी केली. KGF 2 ने पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई करून इतिहास रचला आहे. KGF Chapter 2 हा हिंदी चित्रपटांच्या इतिहासात पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यासोबतच या चित्रपटाच्या सर्व व्हर्जनने (सर्व भाषेतील) जवळपास 150 कोटींची कमाई केली आहे. या दोन गोष्टींव्यतिरिक्त, KGF 2 ने पहिल्या दिवशी KGF Chapter One च्या कमाईपेक्षा जास्त कमाई केली आहे.
पहिल्याच दिवशी 53.95 कोटींची कमाई
हिंदी भाषेतील KGF 2 ने इतिहास रचला आहे. यश, श्रीनिधी शेट्टी, संजय दत्त, रवीना टंडन आणि प्रकाश राज स्टारर चित्रपट KGF Chapter 2 च्या हिंदी आवृत्तीने पहिल्याच दिवशी 53.95 कोटी रुपयांची कमाई केली. या कमाईसह KGF 2 हा ओपनिंग डे मध्ये सर्वाधिक कमाई करणारा (हिंदी) चित्रपट बनला आहे. याआधी हृतिक रोशन-टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ने 51.60 कोटी आणि आमिर खानचा ठग्स ऑफ हिंदोस्तान 50.75 कोटींच्या कलेक्शनसह दुसऱ्या क्रमांकावर होता.
KGF Chapter 2 वर मात…
2018 साली KGF Chapter 1 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही खास कामगिरी करू शकला नाही, पण काही काळानंतर माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. KGF Chapter 2 ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी KGF Chapter 1 च्या कमाईलाही मागे टाकले आहे. KGF One चे लाइफटाइम बॉक्स ऑफिस कलेक्शन 44.09 कोटी रुपये आहे. चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज झाल्याने आता प्रेक्षक KGF Chapter 3 ची वाट पाहत आहेत.
KGF Chapter 2 ने पहिल्या दिवशीच्या एकूण कमाईत मोठा धमाका केला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 134.50 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच, एकीकडे, अनेक चित्रपट आयुष्यभर जितके कलेक्शन करू शकत आहेत, त्याहून अधिक कमाई KGF 2 ने पहिल्याच दिवशी केली आहे. पहिल्याच दिवशी तो 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. विशेष म्हणजे, RRR (हिंदी) चित्रपटाने पहिल्या दिवशी 20.07 कोटी रुपये कमवले, पुष्पा: द राइज (हिंदी) ने 3.33 कोटी रुपये आणि बाहुबली 2 (हिंदी) ने 2017 मध्ये 41 कोटी रुपये कमवले.