ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुलीला घेऊ नका असे म्हटल्याने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हाताच्या अंगठ्याचा चावा घेऊन अंगठा तोडला. याप्रकरणी किशोर विलास पोतदार यांनी शिव अथणीकर (रा. टाकळी रोड, मिरज) याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
किशोर पोतदार यांच्या फिर्यादीनुसार, ते व त्यांची मुलगी सावंत प्लॉट येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त तयारी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मंदिरात काम करीत असताना शिव अथणीकर हा पोतदार यांच्या मुलीला घेण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी पोतदार यांनी “मुलीला हात लावू नका” असे सांगितले. त्यावेळी अथणीकर याने पोतदार यांना शिवीगाळ करून कोयता घेऊन अंगावर धावून गेला. त्यानंतर पोतदार हे घरी परतले. परंतु त्यानंतर अथणीकर हा पोतदार यांच्या घरी जाऊन पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अथणीकर याने पोतदार यांच्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला. यामध्ये त्यांचा अंगठा तुटला असे फिर्यादीत म्हटले आहे.