ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचा निकाल शनिवार (दि.16) रोजी लागला. या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव निवडूण आल्या आहेत. यानंतर पुणे येथे आज (दि.17) रोजी देवेंद्र फडणविसांनी यांनी आपलं मत मांडलं.
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणकीत आम्ही मिळालेल्या मतावर समाधानी आहोत. या निकालावरून स्पष्ट दिसून येते की कोल्हापूरात आमची मते वाढली आणि जागा वाढल्या आहेत.
या निवडणुकीत आमच्या विराेधात तीन पक्ष लढले तरीही त्यांच्या मतांची बेरीज पहा. आम्ही एकटे लढून आमची मते वाढली आहेत. त्यामूळे 2024 ला भाजपच येणार, असा विश्वास असे फडणवीस म्हणाले. तसेच संजय राउत यांच्या बद्दल ते म्हणाले, त्यांना कामे नसावीत आणि त्यांचे डोके फिरले आहे, राेज त्यांच्या टीकेला काेण उत्तर देणार असा सवालही त्यांनी केला.