Tuesday, February 24, 2026
Homeकोल्हापूरकॅन्सरवर औषध देण्याचा बहाणा भोंदूबाबाकडून महिलेवर अत्याचार, कोल्हापूरतील बाबाच्या दरबारात येणाऱ्या दिग्गजांचे...

कॅन्सरवर औषध देण्याचा बहाणा भोंदूबाबाकडून महिलेवर अत्याचार, कोल्हापूरतील बाबाच्या दरबारात येणाऱ्या दिग्गजांचे धाबे दणाणले

कॅन्सर बरा होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार करणारा भोंदूबाबा प्रतीक रामचंद्र मुळे (वय , रा. लुगडी ओळ, मटण मार्केट परिसर) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

 

पीडित महिलेने तक्रार दाखल करताच तो पसार झाला होता. मुळे याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने बाबाच्या दरबारात येणाऱ्या अनेकांना धक्का बसला होता. आता त्याला अटक झाल्याने त्याच्या संपर्कातील काहींचे धाबे दणाणले आहेत.

 

याबाबत अधिक माहिती अशी, भोंदूबाबा प्रतीक मुळे याचा लुगडी ओळ परिसरात दरबार भरत होता. प्रत्येक गुरुवारी त्याच्या दरबारात येणाऱ्या महिलेच्या बहिणीला कॅन्सरचे निदान झाले होते. तिने ही बाब संशयित प्रतीक मुळेच्या कानावर घातली. १६ फेब्रुवारीला ही महिला बहिणीजवळ असताना भोंदूबाबाने तिला फोन केला. तुझ्या बहिणीला कॅन्सरवरील औषध देतो, असे सांगून रंकाळा परिसरात बोलावले. तिथून कळंबा येथील लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच संशयित मुळे हा पसार झाला होता.

 

पोलिसांकडून लॉजचे रजिस्टर जप्त

 

जुना राजवाडा पोलिसांकडून संशयिताच्या घराची झडती घेण्यात आली. तसेच कळंबा परिसरातील ज्या लॉजवर तो गेला होता, तिथेही तपासणी करण्यात आली. तेथील रजिस्टर जप्त करण्यात आले. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पुराव्यांच्या कामी जप्त करण्यात आले.

 

पन्हाळा रोडवर मुळेला अटक

 

संशयित प्रतीक मुळे मलकापूर येथील नातेवाइकांकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पथकाने तिथे जाऊन चौकशी केली होती. दरम्यान, तो पन्हाळा ते बोरपाडळे रस्त्यावर आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सागर वाघ यांना माहिती मिळाली. आज दुपारी मुख्य मार्गावर सापळा रचून त्याला अटक केली. या कारवाईत उपनिरीक्षक शेष मोरे, पोलिस अंमलदार सुरेश पाटील, विनोद कांबळे, युवराज पाटील, राम कोळी, रूपेश माने, अरुण धनगर यांनी भाग घेतला.

 

दिग्गजांची दरबारात हजेरी…

 

लुगडी ओळ परिसरात भरणाऱ्या दरबारात दिग्गजांची हजेरी लागलेली असायची. वेगवेगळ्या सण, उत्सवावेळी मुळे याच्या घरात दरबार भरत होता. शासकीय नोकरीत असणारे अनेकजण त्याच्या दरबारात वेगवेगळ्या सेवा देताना अनेकांनी पाहिले आहे. त्याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर मात्र अनेकांना धक्काच बसला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -