Tuesday, February 24, 2026
Homeब्रेकिंगBreaking : मद्यपींचे वाजणार बारा, कोरोना कमी झाल्याने पुन्हा ‘टेस्टिंग’ सुरू?

Breaking : मद्यपींचे वाजणार बारा, कोरोना कमी झाल्याने पुन्हा ‘टेस्टिंग’ सुरू?

मद्यपान करीत गाडी चालविणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ची कारवाई सुरू केली. मात्र, ही कारवाई केवळ रात्री ९ वाजताच्या सुमारास होत असल्याने त्याच्या वेळेत वाढ करीत रात्री बारा वाजेपर्यंत ही कारवाई करण्यावर वाहतूक पोलिसांचा भर आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मद्यपान करणाऱ्यांचे बारा वाजणार आहे.

पुढल्या आठवड्यापासून त्याची सुरवात होणार, अशी सूत्रांची माहिती आहे. मागील २ महिन्यात राज्यात २२ हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातील बहुतांश कारवाई ही दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी करण्यात आली आहेत.

बार, वाईनशॉपपासून दूर

ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई करताना ती एखादा बार आणि वाइन शॉपच्या बाजूला उभे राहून करण्यावर पोलिसांचा भर असतो. मात्र, याला बार आणि वाइन शॉप मालकांचा विरोध आहे. त्यामुळे आता या कारवाया बार, वाईनशॉप पासून दूरच करण्यावर पोलिसांचा भर राहणार आहे. त्यासाठी जवळपास काही पॉईन्ट नेमण्यात आले आहेत.

अशी आहे शिक्षेची तरतूद

दारू पिऊन गाडी चालवताना पकडल्यास चालकाला २ वर्षांचा तुरुंगवास (police) आणि १५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ नुसार, पहिल्यांदा असे केल्यास तुम्हाला १० हजार किंवा ६ महिने तुरुंगवास होऊ शकतो आणि नंतर तुम्ही पुन्हा अशी चूक करताना पकडले गेल्यास, तुम्हाला २ वर्षे तुरुंगवास आणि १५ हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -