ताजी बातमी ऑनलाईन टीम
RR VS KKR, IPL 2022: IPL 2022 मध्ये आज क्रिकेट रसिकांना कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये (RR VS KKR) एक जबरदस्त सामना पहायला मिळाला. या सामन्यात अनेक चढउतार पहायला मिळाले.
राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 217 अशी विशाल धावसंख्या उभारली. त्यामुळे राजस्थान हा सामना सहज जिंकेल, असा अनेकांचा कयास होता. पण श्रेयस अय्यरच्या केकेआरने तो चुकीचा ठरवला. एवढ्या मोठया धावसंख्येचा केकेआरने आक्रमक सुरुवातीने पाठलासुरु केला. सुनील नरेनची पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट गेली. पण त्यानंतर श्रेयस अय्यर (Shreyas iyer) आणि एरॉन फिंचने डाव सावरला. फिंचने जोरदार फटकेबाजी केली. त्याने 28 चेंडूत 58 धावा केल्या. यात 9 चौकार आणि दोन षटकार होते. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना त्याने करुण नायरकडे सोपा झेल दिला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 217 धावा केल्या होत्या. केकेआरचा डाव 210 धावांवर आटोपला.