Monday, December 23, 2024
Homeआरोग्यब्रेकिंग! पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढीनं डोकं वर काढलं

ब्रेकिंग! पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढीनं डोकं वर काढलं

भारतात कोरोना रुग्णवाढीनं पुन्हा एकदा डोक वर काढलंय की काय, असा प्रश्न गेल्या काही दिवसांच्या आकडेवारीमुळे पडू लागला आहे. कारण गेल्या 24 तासात देशात 1 हजारपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची भर देशात पडली आहे. त्याआधी सोमवारी 2 हजार 183 नव्या रुग्णांची (Corona new cases) भर पडली होती. दरम्यान, गेल्या 24 तासांत 928 लोक बरे झाले आहेत. तर एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4,30,45,527 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे. सध्या देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे.

देशाता 11,860 सक्रिय कोरोना रुग्णांतर सक्रिय कोरोना रुग्णांवर (Active cases) सध्या उपचार सुरु आहेत. तर मृतांची संख्या आता 5,21,966 इतकी झाली आहे. अल्प प्रमाणात का असेना, पण पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढ होत असल्याचं आकडेवारीवरुन पाहायला मिळतंय. ही वाढ चिंताजनक नसलीही तरीही काळजी घेण्याची गरजही व्यक्त होतेय.

केंद्रीय मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार…
पॉझिटिव्हिटी रेट 0.03 टक्के
रिकव्हरी रेट 98.76 टक्के
पॉझिटिव्हिटी रेट 0.03 टक्के
किती जण बरे झाले? 4,25,11,701
मृत्यूदर – 1.21
लसवंत – 186.72 कोटीपेक्षा अधिक

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यात 70 टक्क्यापेक्षा जास्त मृत्यू हे कोमॉर्बिड (अन्य आजार) लोकांचे असल्याचं म्हटलंय. सध्याच्या घडीला कोरोना लसीकरणावर भर देणं, हाच कोरोनाला रोखण्यासाठीचा प्रमुख उपाय असल्याचंही सांगितलं जातंय. 21 जून 2021 पासून सगळ्यांसाठी लस उपलब्ध करुन देण्यात आली होती. जास्तीत जास्त लोकसंख्या ही कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली असावी, या उद्देशानं केंद्र आणि राज्य सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -