Sunday, July 27, 2025
Homeसांगलीसांगली : अंगावर झाडाची फांदी पडून तरुण ठार

सांगली : अंगावर झाडाची फांदी पडून तरुण ठार

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्रीडांगणाच्या भिंतीवर बसलेल्या तरुणांच्या अंगावर झाडाची फांदी पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यश उर्फ हर्षवर्धन बाळासाहेब कदम (वय 23, रा. माळी गल्ली, मिरज) असे त्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यश कदम हा मंगळवारी दुपारी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्रीडांगणाजवळ असलेल्या भिंतीवर बसला होता.

दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वारा सुटला होता. त्यावेळी भिंतीजवळ असलेल्या वडाच्या झाडाची फांदी यश याच्या अंगावर पडली. यश याच्या अंगावर झाडाची फांदी पडताच त्याला वाचविण्यासाठी क्रीडांगणावरील अन्य नागरिकांनी धाव घेतली. परंतु फांदीखाली अडकलेल्या यशचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर अग्निशमन विभागाच्या मदतीने झाडाखाली अडकलेल्या यशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

भरती होण्याआधीच काळाचा घाला
यश याच्या वडिलांचा सलूनचा व्यवसाय आहे. यश हा पोलिस भरतीसाठी प्रयत्न करीत होता. घर क्रीडांगणाजवळ असल्याने यश शासकीय रुग्णालयाच्या क्रीडांगणावर सरावासाठी येत होता. परंतु भरती होण्यापूर्वीच त्याच्यावर काळाने घातला. कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -