ताजी बातमी ऑनलाइन टीम
आळते येथील धुळोबा यात्रेसाठी सासन काठी बरोबर आलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यु झाला सुरेश चिंतामणी जंगटे ( वय ४३ ) रा. भोज ता.निपाणी असे या भाविकाचे नाव असुन या दुर्दैवी घटनेने सर्वत्र शोककळा पसरली होती.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी भोज येथील काही भाविक सासणकाठी सह यात्रेच्या मुख्य दिवशी आले होते. या मध्ये सुरेश जंगटे यांचाही समावेश होता . सकाळपासुन जंगटे व इतर भाविकांनी सासणकाठी नाचवल्यानंतर महाप्रसाद घेतला जंगटे यांना चक्कर आल्याने ते खाली कोसळले यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या इतर भाविकांनी त्यांना उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यु झाला. शवविच्छेदानंतर पहाटे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली आहे.