Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रमहागाईविरोधात माकपचे उद्या देशव्यापी आंदोलन

महागाईविरोधात माकपचे उद्या देशव्यापी आंदोलन

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल व गॅसच्या वाढविलेल्या किमतीविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे बुधवारी (दि. 27) सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत पेट्रोल-डिझेल, गॅस खरेदी-विक्री एक तासासाठी बंद ठेवून देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल- डिझेलच्या किमतीसह गॅस, खाद्यतेल, अन्नधान्य, भाजीपाला या दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव वेगाने वाढले आहेत. 2014 ते 2022 या कालखंडात राज्य सरकारांच्या करांत फक्त 35 टक्के वाढ झाली, पेट्रोल-डिझेलवरील केंद्र सरकारच्या करांमध्ये ताबडतोब 50 टक्के कपात करावी, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमती 500 रुपयांपर्यंत खाली आणाव्या, या मागण्यांसाठी बुधवारी (दि.27) सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत पेट्रोल-डिझेल, गॅस खरेदी-विक्री एक तासासाठी बंद ठेवण्याच्या देशव्यापी सत्याग्रहात पेट्रोल-डिझेल, गॅस वितरकांनी सहभागी होण्याचे आवाहन माकपचे डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, अ‍ॅड. वसुधा कराड, अ‍ॅड. तानाजी जायभावे, दिनेश सातभाई, दगडू व्हडगर, संतोष काकडे, एकनाथ इंगळे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -