देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्याउपक्रमांतर्गत हरियाणा सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट वाटप करण्यात येणार आहे. येत्या 5 मे पासून राज्यातील 10 वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेटचे वाटप करण्यात येईल.
हरियाणा सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सरकारकडून दिल्या जाणाऱ्या टॅबलेटमध्ये शैक्षणिक सॉफ्टवेअर प्री-लोड करण्यात आले आहे. 5 लाख विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट डेटाही दिला जाईल. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्त्वातील सरकारने विद्यार्थ्यांच्या फायद्याचा निर्णय घेतल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठाच्या टागोर सभागृहात 5 मे रोजी मोफत टॅबलेट वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 119 विद्यार्थ्यांना टॅबलेट वितरित करण्यात येतील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. रोहतक शहरातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट दिले जातील, असे हरियाणा सरकारतर्फे सांगण्यात येत आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात 33 हजार पीजीटींनाही मोफत टॅबलेट देण्याची सरकारचे नियोजन आहे. नंतर इतर खालच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना टॅबलेटची तरतूद टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे.