Sunday, December 22, 2024
Homeदेश विदेशभारताने रचला इतिहास, 73 वर्षांत पहिल्यांदाच पटकावले थॉमस चषकाचे विजेतेपद

भारताने रचला इतिहास, 73 वर्षांत पहिल्यांदाच पटकावले थॉमस चषकाचे विजेतेपद

ताजी बातमी ऑनलाईन टीम

थॉमस कपमध्ये भारताने इतिहास रचला आहे. भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने अंतिम फेरीत इंडोनेशियाच्या बलाढ्य संघाचा 3-0 असा पराभव करून इतिहासात प्रथमच विजेतेपद पटकावले आहे. 73 वर्षांनी हा कप जिंकत भारताने इतिहास रचला आहे. बँकॉकच्या इम्पॅक्ट एरिनामध्ये ही स्पर्धा सुरु होती. या सामन्यांमध्ये भारतासमोर इंडोनेशियाचा संघ होता. अखेरच्या सामन्यात किदाम्बी श्रीकांतने (Kidambi Srikanth) जोनातन क्रिस्टीचा (Jonatan Christie) पराभव करत सरळ 3-0 ने सामना जिंकला.



15 मे रोजी पहिल्या सामन्यात लक्ष्य सेन (Lakshya Sen) आणि अँथनी सिनिसुका गिंटिंग यांच्यात सामना झाला. यात लक्ष्यने सिनिसुकाचा 8-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. दुसरा सामना सात्विकसाईराज रँकीरेड्डे (Satwiksairaj Rankireddey) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या जोडीने दुहेरीत 18-21, 23-21, 21-19 असा जिंकला, तर तिसरा सामना एकेरीचा होता. त्यात किदाम्बी श्रीकांतने जोनाथन क्रिस्टीचा 21- 15, 23-21 ने पराभव केला.

मलेशिया आणि डेन्मार्क सारख्या संघांचा पराभव करून भारताने पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास खूप वाढला होता. अंतिम फेरीत 14 वेळा चॅम्पियन्सचा विक्रम नावार असलेल्या इंडोनेशियाचा नमवून भारताने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत इंडोनेशियाची कामगिरी चांगली राहिली होती. इंडोनेशियाने एकही सामना गमावला नव्हता. दुसरीकडे भारतीय संघाला ग्रुप स्टेजमध्ये चायनीज तैपेईविरुद्ध एकमेव पराभवाचा सामना कारावा लागला. मात्र अंतिम फेरीत इंडोनेशियाला पराभूत करून भारताने थॉमस चषकाचे विजेतेपद मिळवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -