Saturday, January 11, 2025
Homeक्रीडाCSKVs GT IPL 2022: ऋतुराज गायकवाडचे फिफ्टी, पण CSK ने आधीच हार...

CSKVs GT IPL 2022: ऋतुराज गायकवाडचे फिफ्टी, पण CSK ने आधीच हार मानली?

ताजी बातमी ऑनलाईन टीम


मुंबई: IPL 2022 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्समध्ये (CSKVS GT) सामना सुरु आहे. वानखेडे स्टेडियमवर 62 वा सामना खेळला जात आहे. ऋतुराज गायकवाडच्या (53) अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने गुजरातला विजयासाठी 134 धावांचे टार्गेट दिलं आहे. आज चेन्नईचा संघ मैदानावर खेळत असताना त्यांच्यामध्ये धावांची भूक दिसली नाही. टी-20 क्रिकेटला साजेसा खेळ त्यांनी केला नाही.



चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि जगदीशनने चांगली फलंदाजी केली. पण त्यांच्या फलंदाजीतही ती आक्रमकता नव्हती. ऋतुराजने 49 चेंडूत 53 धावा केल्या. यात चार चौकार आणि एक षटकार होता. ड्वेन कॉनवेचा पहिला विकेट लवकर गेला. मोहम्मद शमीनमे त्याला 5 धावांवर सहाकरवी झेलबाद केलं. त्यानंतर मोइन अली आणि ऋतुराज गायकवाडने डाव सावरला. पण वेगाने धावा जमवल्या नाहीत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -