Tuesday, February 24, 2026
Homeब्रेकिंगलग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, भीषण अपघातात 6 जण ठार तर 3 गंभीर...

लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, भीषण अपघातात 6 जण ठार तर 3 गंभीर जखमी!

उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडावर काळाने घाला घातला आहे. उत्तर प्रदेशच्या बलरामपूर जिल्ह्यात बोलेरो आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात बलरापूर जिल्ह्यातील तुलसीपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील गणवारिया गावाजवळ झाला. बोलेरो गाडीमधून 9 जण लग्न समारंभासाठी जात होते. त्याचवेळी गणवारिया गावाजवळ बोलेरोने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये बोलेरो गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. हा अपघात इतका भीषण होता की 6 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 9.30 च्या सुमारास बोलेरो कारने ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली. या अपघातामध्ये सुरुवातीला पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार गंभीर जखमी झाले होते. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर तुळशीपूर कम्युनिटी सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. अपघातातील सर्व मृत हे महाराजगंज तराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मणपूर गावचे रहिवासी आहेत. या अपघातानंतर लक्ष्मणपूर गावावर शोककळा पसरली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -