शिप्पूर तर्फ आजरा येथे चार चाकी रिव्हर्स घेत असताना बसलेल्या धडकेत एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रामचंद्र बाळू रायकर (वय 85 रा. शिपुर तर्फ आजरा, ता. गडहिंग्लज) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी (20 मे) सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी वाहन चालकाविरोधात गडहिंग्लज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रामचंद्र रायकर हे सकाळी दूध आणण्यासाठी दूध डेरीकडे जात होते.
दरम्यान, डेअरीनजीक शिवाजी पाटील हे आपली चारचाकी (एम एच ५०, ए ५२५२) पाठीमागे घेत होते. यावेळी गाडीच्या पाठीमागील बाजूने डेरी कडे जाणाऱ्या रामचंद्र रायकर यांना गाडीची जोरदार धडक बसली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज येथे आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.






