ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर:- शाहू टोलनाक्यावरून कोल्हापुरात येणारा ऑक्सिजन टँकर लिक झाल्याची घटना आज रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. यावेळी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात वाया गेला असून ते थांबवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान बघ्याची मोठी गर्दी झाली आहे. ही घटना शाहू टोलनाका ते शिवाजी विद्यापीठ रोडवर घडली.
रात्री साडे दहा वाजताची घटना आहे. शाहू नाका येथे अचानक टँकरमधून गॅस बाहेर येऊ लागला. चालकाने लीक होणारा गॅस बंद करण्याचा प्रयत्न केला पण लवकर बंद झाला नाही. यामुळे परिसरातील लोकांची काही काळ धावपळ झाली. यावेळी लोकांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे कोणतीही हानी झालेली नाही.