Saturday, January 31, 2026
Homeकोल्हापूरराज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसैनिक संजय पवार यांच्या नावाचीही चर्चा

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसैनिक संजय पवार यांच्या नावाचीही चर्चा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय राज्यसभेची उमेदवारी देता येणार नाही, या अटीवर शिवसेना ठाम असल्याने संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा मार्ग खडतर झाला आहे. दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. संजय पवार हे कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. संजय पवार यांना उमेदवारी देऊन संभाजीराजेंना शह देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.


दरम्यान, संजय पवार यांनी आपल्याला उमेदवारी मिळाली तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. माझी नावाची चर्चा सुरु आहे. पण अद्याप वरिष्ठांकडून अजून काही सूचना आलेली नाही. संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल आम्हाला आदर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -