ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई : गव्हापाठोपाठ केंद्र सरकारने साखर निर्यातीबाबतही आपले धोरण स्पष्ट केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून साखर निर्यातीबाबत वेगवेगळे तर्कवितर्क मांडले जात होते. पण आता निर्यातीच्या धोरणाबाबत केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. वाढत्या महागाईमुळेच साखर निर्यातीवर अंशत: निर्बंध आणल्याचे कारण समोर आले आहे.
त्यामुळे आता 1 जून पासून नवीन निर्यात करार आणि प्रत्यक्षात होणारी निर्यात या दोन्ही बाबींसाठी साखर कारखाना प्रशासनाला परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पुढचा निर्णय होईपर्यंत कारखान्यांना केंद्र सरकार सांगेल त्याच पध्दतीने साखरेची निर्यात करावी लागणार आहे.