Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर सरवडेत चप्पल दुकानाला शॉर्ट सर्किटने आग

कोल्हापूर सरवडेत चप्पल दुकानाला शॉर्ट सर्किटने आग

ताजी बातमी ऑनलाईन टीम

येथील चप्पल व्यापारी पांडुरंग संपत्ती पोवार यांचे मुख्य बाजारपेठेत व्यंकेटेश्वरा चप्पल दुकानला शॉर्ट सर्किटने आग लागली. तब्बल चार तास चाललेल्या या आगीत सुमारे पंचवीस लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. आठवड्याच्या बाजरादिवशीच ही दुर्घटना घडल्याने ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून आग वीजवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे जीवितहानी टळली.



सरवडे बाजारपेठेत पांडुरंग पोवार यांचे चप्पल दुकान आहे. पावसाळा सिझन असल्याने त्यांनी दुकानात पंचवीस लाखाहून अधिक किंमतीचा चप्पलांचा माल भरला होता. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दुकान मालक दुकान बंद करून जेवणासाठी गेले होते. दरम्यान अचानक शॉर्ट सर्कीटने दुकानास आग लागली. बघता बघता आगीने रूद्र रूप धारण केले. दुकानच्या तीनही मजल्यावर चप्पला भरून ठेवल्या होत्या. एका पाठोपाठ एक अशा सर्वच मजल्यांना आग लागल्याने बाजारपेठेतून धुरांचे लोठ बाहेर पडत होते. यावेळी तात्काळ ग्रामस्थांनी आणि व्यापाऱ्यांनी बिद्री, भोगावती, हमीदवाडा साखर कारखान्याबरोबर मुरगुड नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला आगीची माहिती दिली. तात्काळ घटनास्थळी अग्नीशामक दलाचे बंब दाखल झाले .पाण्याचा मारा करीत आगीची तीव्रता कमी केली. तब्बल तीन तास मुख्य बाजारपेठेत आगीचे तांडव सुरू होते.

तर आगीची तीव्रता इतकी होती की इमारतीचा स्लॅब फुटून मोठा आवाज झाला. इमारतीच्या काचा आणि स्लॅब चे तुकडे सुमारे तीस फुट अंतरावर उडून पडले. शेजारीच अनेक दुकाने तर एका बाजुला लोकवस्ती होती. घटनेचे गांभीर्य ओळखून ज्वालाग्राही वस्तू बाहेर काढल्या. यामुळे मोठा अनर्थ टळला.सुमारे पाच तास आग सुरू होती. तर सुनील कदम, अनिल तावडे, अमित कांबळे, व्यापारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आदींनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.तर ऐन पावसाळ्याच्या हंगामात दुकान मालकानी पंचवीस लाखांचा माल दुकानात भरला होता. सदरच्या दुर्घटनेमुळे दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

तर आग आटोक्यात आली असती… घटना घडल्यानंतर तब्बल एक तासांनी बिद्री साखर कारखान्याचा अग्निशामक दलाचा बंब दाखल झाला. पण त्या बंबात अपुरे पाणी होते. यामुळे आग आटोक्यात आली नाही. जर बंब पुर्ण क्षमतेने भरला असता तर तात्काळ आग आटोक्यात आली असती आणि नुकसान ही टळले असते अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -