Monday, December 23, 2024
Homeइचलकरंजीइनपाच्या कर्मचार्‍याचा 'मृत्यू' ; लागला विजेचा धक्का : गावभागावर शोककळा

इनपाच्या कर्मचार्‍याचा ‘मृत्यू’ ; लागला विजेचा धक्का : गावभागावर शोककळा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

विद्युत मोटारीचा शॉक लागून नगरपालिकेतील कर्मचारी यशवंत शंकर कोकरे (वय ५३ रा. टिळक रोड) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेची नोंद गावभाव पोलिस ठाण्यात झाली आहे.


याबाबत मिळालेली माहिती अशी, यशवंत कोकरे हे जयभवानी तालीम परिसरात राहण्यास आहेत. ते नगरपरिषदेचे कर्मचारी होते. शनिवारी मयत-यश दुपारच्या सुमारास नळाला पाणी आल्याने विद्युत मोटार सुरु करण्यात आली होती.

त्याचदरम्यान यशवंत कोकरे हे घरात आले असता विद्युत मोटारीची पाण्याची पाईप निघाल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी पाईप लावण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना जोराचा वीजेचा धक्का लागला. वीजेच्या धक्क्याने कोकरे हे जाग्यावरच कोसळले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले.

रुग्णालयाने दिलेल्या वर्दीनुसार गावभाग त कोकरे पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -