Sunday, August 3, 2025
Homeमहाराष्ट्रअपघातामुळे दारू विक्रीचा पर्दापाश: कार- दुचाकीच्या धडकेत 2 जण जखमी

अपघातामुळे दारू विक्रीचा पर्दापाश: कार- दुचाकीच्या धडकेत 2 जण जखमी

कराड- चांदोली मार्गावर दारू वाहतूक करणारी कार व दुचाकीची जोरदार धडक झाली. उंडाळे येथे समोरासमोर ही धडक झाला. अपघातात दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून दारूचे बॉक्स आढळल्याने दारूविक्री तेजीत असल्याचे चित्र समोर आले. यावेळी पोलिसांनी दारू बॉक्ससह कारही जप्त केली आहे.

कराड-चांदोली रोडवर उंडाळे नजीक नव्याने सुरू होत असलेल्या जयभवानी मेडिकलसमोर उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू होता. त्याचवेळी कराडहून शेडगेवाडीकडे जाणारी कार तर घोगावहून कराडकडे दुचाकी निघाली होती. यावेळी कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर मोठा आवाज झाला. त्यामुळे तेथे नागरिकांची मोठी गर्दी जमली. अपघातात दुचाकीस्वार दोघेजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपघातग्रस्त कार व दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात ग्रस्त कारची पोलिसांनी घटनास्थळावर तपासणी केली असता कारमध्ये देशी दारूचे 17 बॉक्ससह 67 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला आहे. उंडाळे पोलिस दूरक्षेत्रात या अपघाताची नोंद झाली असून दारूसह कार पोलिसांनी जप्त केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दीपज्योती पाटील करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -