पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज, 14 जून रोजी जगतगुरू संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडले. यावेळी वारकऱ्यांनी संत तुकराम महाराजांचा जयघोष केला. यावेळी पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
सर्व वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात पंतप्रधानांचे स्वागत केले. इतिहासात पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधानांनी देहूला भेट दिली. पंतप्रधानांच्या स्वागत समारंभासाठी 200 ते 250 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली होती. यात टाळकरी, मृदुंगधारी, विणेकरी, पताका धारी, हंडाकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला अशांचा समावेश होता. दरम्यान, आषाढी वारीसाठी येत्या सोमवारी तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
दरम्यान, देहू येथील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान मुंबईकडे रवाना होणार आहेत. राजभवनमध्ये ‘जलभूषण’ या नव्याने उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचे उद्घाटन पंतप्रधानांच्य यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक पोलिस विभागाने वाहतुकीच्या मार्गात बदल केला आहे.
पंतप्रधान आज वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरला भेट देणार आहे. या अनुषंगाने बीकेसीकडे येणारे आणि जाणारे सर्व रस्ते दुपारी 4 ते 8 पर्यंत पूर्णपणे बंद असणार आहेत.
पीएम मोदींसोबत अजितदादाचा प्रवास…
मुंबई पीएम नरेंद्र मोदी हे देहू दौरावर आहे. त्यानंतर पीएम मोदी यांच्या समवते उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील एकत्र हेलिकॉप्टरमध्ये प्रवास केला. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या.
पहाटेच्या शपथविधी नंतर घडलेल्या राजकीय घडामोडी त्यानंतर अजित पवार यांनी अधुनमधून पीएम मोदी यांना सकारात्मक भूमिका, अजित पवार यांच्यासह कुटूंबावर आयकर विभाग कारवाई त्यातच आता अपक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या मदतीने भाजपाने मिळवलेला भाजपाने विजय या राजकीय घडामोडीनंतर पुण्यात पीएम मोदी यांच्या दौरात थेट अजित पवार, फडणवीस एकाच हेलिक्फाटरमध्ये अर्धा तास प्रवास केला. अर्थात या हवेतील एकांत भेटीत अजित पवार यांच्या समवेत काय राजकीय विषयावर चर्चा काय झाली असावी, यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.