मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketaki Chitale) तिच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे अडचणीमध्ये आहे. केतकी चितळे सध्या तुरुंगामध्ये आहे. केतकी चितळेला ( Ketaki Chitale ) ठाणे न्यायलयाने आज जामीन मंजूर केला आहे. केतकी चितळेला अॅट्रोसिटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) अटक केल्यानंतर आज ठाणे न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. केतकीला जामीन मिळाला (Ketaki Chitale Granted Bail) असला तरी सुद्धा केतकीला पुढचे काही दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे.
नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्यात 2020 मध्ये केतकी चितळेविरोधात अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी केतकी चितळेला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. कोर्टाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली होती. याप्रकरणी केतकीला आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर केतकीला जामीन मंजूर केला. केतकी चितळे सध्या तळोजा येथील तुरुंगात आहे.
केतकीला ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे दिलासा जरी मिळाला असला तरी सुद्धा केतकीला पुढचे काही दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे. कारण केतकी आणखी एका प्रकरणामध्ये आरोपी आहे. या प्रकरणी तिच्या जामीनावर येत्या 21 जून रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी केतकीविरोधात राज्यभरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पण याप्रकरणी तिला केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत केतकी चितळेने मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे.