Saturday, February 21, 2026
Homeब्रेकिंग'या' ठिकाणी अतिमुसळधार पडणार पाऊस!

‘या’ ठिकाणी अतिमुसळधार पडणार पाऊस!

भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी मुंबई, ठाणे आणि इतर आसपासच्या भागांसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट (Orange alert for Mumbai) जारी केला आहे. या परिसरात काही ठिकाणी मुसळधार आणि काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज (Heavy rains forecast) व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी आज ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

यापूर्वी रविवारी आयएमडीच्या प्रवक्त्यांनी नागरिकांना सोमवारी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला होता. “पुढील दोन किंवा तीन दिवसांत शहरात सुमारे 130 मिमी पाऊस पडू शकतो, जो मुंबईच्या मानकांनुसार चिंताजनक नाही, परंतु त्यामुळे काही भागात पाणी साचू शकते” असा इशारा त्यांनी दिला होता.

IMD ने रविवारी आपल्या दैनंदिन बुलेटिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार “कर्नाटक, कोकण आणि गोवा, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये पुढील पाच दिवसांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नैऋत्य मान्सूनच्या प्रारंभाची अधिकृत तारीख 11 जून होती. परंतु मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि मधूनमधून पाऊस पडत आहे. रविवारी पहाटे काही भागात पहिला कमी दृश्यमान पाऊस पडला. IMD नुसार मुंबईत आतापर्यंत सुमारे 16.2 मिमी पाऊस झाला आहे, तर ठाणे आणि पालघरमध्ये अनुक्रमे 1.3 मिमी आणि 7.77 मिमी पाऊस झाला आहे.

यावर्षी मान्सूचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. पणा मान्सूनचा प्रवास लांबला आणि मान्सूनचे उशिराने आगमन झाले. आता मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असला तरी अजूनही म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. जूनच्या मध्यापर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पावसाची प्रतिक्षा आहे. मात्र काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने तेथील बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -