Sunday, July 6, 2025
Homeब्रेकिंगमान्सूनबाबत महत्वाची अपडेट, हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी..!!

मान्सूनबाबत महत्वाची अपडेट, हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी..!!

राज्यात दडी मारलेल्या पावसाला अखेर कालपासून (ता. 20) जोरदार सुरुवात झाली. कोकणासह राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. पावसाला सुरुवात झाली असली, तरी चांगली ओल झाल्याशिवाय पेरणीची घाई करु नये, असं आवाहन हवामान विभागाने केले आहे..

मुंबईत सोमवारी पावसाचे आगमन झालं. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील 6 जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’, तर 12 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

खरं तर केरळात वेळेआधी माॅन्सून पोचला होता. त्यानंतर 31 मेपर्यंत गोव्यात दाखल झाल्यानंतर, तब्बल 10 दिवसांनी माॅन्सूनने कोकणात प्रवेश केला. नियमित वेळेनुसार साधारणतः 15 जून रोजी संपूर्ण राज्यात मॉन्सून दाखल होतो. मात्र, यंदा चार दिवस उशिरा माॅन्सून राज्यात सर्वदूर दाखल झाला आहे.

राज्यात आता माॅन्सून सक्रिय झाला असून, हळूहळू तो पुढे सरकत आहे. राज्यात ठिकठिकाणी चांगला पाऊस कोसळत आहे. मुंबई व उपनगरांसह, ठाणे, पालघर, पुणे, परभणी, चंद्रपूर, वाशिम, नागपूर, अहमदनगर जिल्ह्यांत चांगला पाऊस झाल्याचे समजते. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अद्याप काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

देशाच्या बहुतांश भागात अद्याप माॅन्सूनची हजेरी लागलेली नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांनी म्हणावा, तसा वेग आलेला नाही. आतापर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार खरीप लागवडीत घट दिसून आली. पेरण्यांसाठी शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत.

ऑरेंज अलर्ट (कोकण) : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

यलो अलर्ट (मध्य महाराष्ट्र) : सातारा, कोल्हापूर, विदर्भ यवतमाळ, चंद्रपूर

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -