Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगदेवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरे यांना फोन, उद्या भाजपला सहकार्य करण्याचे केले...

देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरे यांना फोन, उद्या भाजपला सहकार्य करण्याचे केले आवाहन

महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political Crises) दिवसेंदिवस वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशा सत्तासंघर्षाचा आठवा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagatsigh Koshyari) यांची मंगळवारी रात्री उशीरा भेट घेवून बहुमताचा दावा केला आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे फ्लोअर टेस्टची मागणी केली आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनाला प्रत्युत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे सरकारचे मंत्री आणि शिवसेना तसेच अपक्ष आमदारांनी गुवाहाटी गाठत एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे पण ते आपल्या अटींवर ठाम आहेत. सध्या राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यांच्यावर सुरुच आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरे यांना फोन
– उद्या भाजपला सहकार्य करण्याचे केले आवाहन
– मनसे भाजपला सहकार्य करणार का? याकडे सगळ्याचं लक्ष

बहुमत चाचणीविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
– महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारीकडून मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याबाबत पत्र
– शिवसेना नेते सुनिल प्रभू यांनी बहुमत चाचणीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
– सुप्रीम कोर्टाने शिवसेनेची याचिका स्विकारली, सायंकाळी 5 वाजता सुनावणी होणार

एकनाथ शिंदे गट उद्या मुंबईत येणार

-शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार गुरुवारी मुंबईत दाखल होणार
-एकनाथ शिंदे यांनीच गुवाहाटीमध्ये ही माहिती दिली
– शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आज आज कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -