राज्यात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाच्या तडाख्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांना पूराचा धोका निर्माण झाला आहे. रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तिन्ही जिल्ह्यांतील धरणे धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली आहेत. त्यामुळे या धरणांमधून पाणी सोडण्याचा विचार जिल्हा प्रशासन करत आहे. धरणाचे पाणी सोडल्यास अनेक गावे बाधित होण्याची शक्यता आहे.
धरणे भरली, नद्यांना पूर
मंगळवारी 05 जुलै रोजी दुपारी 04 वाजता विविध जिल्ह्यातील 20 धरणे पाण्याखाली गेली आहेत. राजाराम धरणात पंचगंगा नदीची पाणीपातळी 26 फूट 6 इंचांवर पोहोचली आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट तर धोक्याची पातळी 43 फूट आहे. त्यामुळे आजही पाऊस सुरूच राहिला तर पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईत येत्या 72 तासात अतिवृष्टी
मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील अंधेरी, सायन, चेंबूर आणि कुर्ला येथील काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 12 तासांत मुंबईत 95.81 मिमी, पूर्व उपनगरात 115.09 मिमी आणि पश्चिम उपनगरात 116.73 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने मुंबईत येत्या 72 तासात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे लोकांना नागरिकांना राहण्याच्या सूचना देण्यात येत आहे.




