Saturday, July 26, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर, सोलापूरसह कर्नाटकाला भूकंपाचा धक्का

कोल्हापूर, सोलापूरसह कर्नाटकाला भूकंपाचा धक्का

कोल्हापूरसह राज्यातील काही भाग आज शनिवारी सकाळी भूकंपाने हादरला. सोलापूर जिल्ह्यापासून जवळ असलेल्या कर्नाटकातील विजापूरमध्येही भूकंपाचे हादरे बसले. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील काही भागात या भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप सौम्य स्वरुपाचा असून रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.६ इतकी होती. हा भूकंप शनिवारी सकाळी ६.२४ वाजता झाला असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप मापन केंद्राने (National Center for Seismology) दिली आहे. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप नाही.

आज सकाळी सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी भूकंपाचे सौम्य धक्के अनुभवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू कर्नाटकातील विजापूरजवळ आहे. लोक सकाळी झोपेत असताना अचानक घरातील खुर्व्या हालू लागल्याचे दिसले. यामुळे काही लोक घरातून बाहेर आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -