ताजी बातमी ऑनलाईन टीम
इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि मालिकेतील निर्णायक सामन्यासाठी आज टीम इंडिया मैदानात उतरली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकल्याने या मालिकेतील हा फायनल सामना आहे. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडची सुरुवात खराब झाली असून, मोहम्मद सिराज याच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडने दोन गडी गमावले आहेत.
सिराजची भेदक गोलंदाजी आजच्या सामन्यात मोहम्मद सिराज याने जसप्रीत बुमराह याची कमतरता जाणवू दिली नाही. सामन्याच्या दुसऱ्या षटकातच त्याने
इंग्लंडला सलग दोन धक्के दिले. त्याने जॉनी बेअरस्टो याला शून्यवर तंबूत धाडले. यापाठोपाठ जो रुटलाही शून्यवर बाद केले. पाच षटकात इंग्लंडची अवस्था दोन बाद ३२ धावा अशी झाली आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.
IND VS ENG 3rd ODI: इंग्लंडला मोहम्मद सिराजने दिले सलग दोन धक्के
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -