नाशिकमध्ये किरकोळ वादातून पतीने पत्नीची पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून हत्या (Nashik Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये (Malegaon Murder Case) ही घटना घडली आहे. या पती-पत्नींमध्ये सतत वाद होत होता. संतप्त झालेल्या पतीने पत्नीला मारहाण करत तिची हत्या केली. या घटनेमुळे मालेगाव हादरले आहे. याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी (Malegaon Police) आरोपी पतीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव शहरातील रमजानपुरा भागात ही घटना घडली आहे. अब्दुल वफा हा आपल्या पत्नीसह राहत होता. अब्दुलची आपल्या पत्नींमध्ये सतत भांडणं होत होती. अब्दुल सतत आपल्या पत्नीवर संशय घेत होता. या कारणावरुन त्यांच्यात सतत भांडणं होत होती. ऐवढंच नाही तर अब्दुल पत्नीला मारहाण देखील करायचा. 21 जुलै रोजी दोघांमध्ये याच कारणावरुन भांडण झाले.
अब्दुल आणि त्याच्या पत्नीमधील वाद खूपच वाढला. यादरम्यान संतप्त झालेल्या अब्दुलने टोकाचे पाऊल उचलत आधी पत्नीला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने घरामध्ये असलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून बुडवून पत्नीची हत्या केली. या घटनेने मालेगाव हादरुन गेले आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अब्दुलच्या पत्नीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर त्यांनी अब्दुलविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.