‘तुझ्या वडीलांनी माझ्याकडून जे पैसे घेतले आहेत ते परत दे’ अन्यथा घरातील महिलांची अब्रु लुटण्याची(Rape) धमकी देणाऱ्या युवकासह तिघांवर करवीर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील एका उपनगरात हा प्रकार घडला. अक्षय पाटील असे संशयीताचे नाव आहे.
फिर्यादीने म्हटले आहे, अक्षय पाटील व त्याचे दोघे मित्र रात्री १०.३० वाजता संरक्षक भिंतीवरून उडी मारून घरात आले. तुझ्या वडीलांनी घेतलेले पैसे, गाडी अन्यथा दागिने दे असे म्हणून धमकावले. पैसे दिले नाहीस तर तुझ्या घरातील महिलांची अब्रु लुटणार(Rape) असे धमकावले. त्यानंतर दारात लावलेली दुचाकी व घराचे नुकसान केले. अक्षयच्या धमकीमुळे संतापलेल्या युवकाने करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हेड कॉन्स्टेबल गुरव पुढील तपास करीत आहेत.