Friday, November 14, 2025
Homeसांगलीसांगली ; अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधमास अटक

सांगली ; अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधमास अटक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अल्पवयीन मुलाला हेरून त्याचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. अमोल उर्फ प्रदीप गुंडा पाटील (वय २६ रा. कुमठे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदरची घटना हि बुधवार दि. २७ जुलै रोजी तासगाव तालुक्यातील कुमठे येथे घडली होती. पीडित मुलाच्या पालकांनी या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, संशयित पाटील याने काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे एका बालकावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.



याबाबत अधिक माहिती अशी कि, कुमठे येथे पीडित मुलगा आपल्या कुटुंबियांसह राहतो. गावामध्ये पीडित मुलगा हा एकटाच असताना त्याला अमिश दाखवून संशयित अमोल उर्फ प्रदीप पाटील याने त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. घडलेल्या या प्रकारानंतर पीडित मुलगा हा भयभीत झाला होता. त्याने घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. यानंतर पालकांनी पाटील याच्या विरोधात तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अमोल उर्फ प्रदीप पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. घडलेल्या या प्रकारापासून संशयित पाटील हा पसार झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक त्याच्या मागावर होते.

माहिती घेत असताना पथकातील कर्मचारी सागर टिंगरे यांना माहिती मिळाली कि, सदरच्या गुन्ह्यातील आरोपी हा कुमठा फाटा येथे थांबला आहे. पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने कुमठा फाटा येथे धाव घेत छापा टाकून पाटील यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडे अधिक तपास केल्यानंतर अशाच प्रकारे त्याने काही महिन्यांपूर्वी एका बालकावर लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले. यानंतर त्याला अटक करून पुढील तपासासाठी तासगाव पोलिसांकडे सुपूर्त केले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक भगवान पालवे, अच्युत सूर्यवंशी, संदीप गुरव, सागर टिंगरे, अनिल कोळेकर, मछिंद्र बर्डे आणि सोहेल कार्तीयानी यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -