Wednesday, August 27, 2025
Homeसांगलीआता पुन्हा एकदा सिद्ध झाले की मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाही

आता पुन्हा एकदा सिद्ध झाले की मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाही


गोपीचंद पडळकर यांची टीका

मराठा समाजाला पूर्वलक्ष्यी प्रभावाने ews चा लाभ देण्याचा ठाकरे – पवार सरकारमधील निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्याच वेळेस सांगत होतो की कायद्यामध्ये पूर्वलक्ष्यी प्रभावाने काही देता येत नाही. आता पुन्हा एकदा सिद्ध झाले की काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाही.अशी अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.


त्याचप्रमाणे काका पुतण्याचं हे दुखःआहे की मुळात मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मा. देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही घराणेशाहीला संधी न देता एका साध्या मराठा कुटुंबातील मा.श्री एकनाथजी शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली.असेही पडळकर बोलत होते.


म्हणून यांच्या पोटात कळा उठतायेत आणि म्हणूनच ते आता इकडे तिकडे बोंबा मारत फिरतायेत.गरीब मराठा समाजाचं भलं करण्यापेक्षा यांना आपल्याच पै पाव्हण्यांचं भलं करायचंय ,हीच यांची खरी वृत्ती बाकी सगळ्या आपुलकीच्या भूलथापा.अशी घणाघाती टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -