Monday, July 7, 2025
Homeराजकीय घडामोडी'नागाला कितीही दूध पाजलं तरी तो चावतोच', उद्धव ठाकरेंची बंडखोरांवर सडकून टीका!

‘नागाला कितीही दूध पाजलं तरी तो चावतोच’, उद्धव ठाकरेंची बंडखोरांवर सडकून टीका!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यांच्यासोबत शिवसेनेसोबत अनेक अपक्ष आमदार सोबत गेले. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकारला पायउतार व्हावे लागले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत (BJP) येत सत्ता स्थापन केली. राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडी अजूनही सुरुच आहे. अशामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
वारंवार शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टीका करताना दिसतात. त्यांनी पुन्हा एकदा या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. ‘नागाला कितीही दूध पाजलं तरी तो चावतोच. या सर्वांनाही निष्ठेचं दूध पाजलं, पण ही औलाद गद्दार निघाली.’, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे.

आज मातोश्रीवर जळगावातील शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर जोरदार टीका केली आहे. ‘एक गुलाब गेलं, दुसरे गुलाबराव वाघ आपल्यासोबत आहेत. जे मोठे केलेले सोबत नसले तरी त्यांना मोठे करणारे माझ्यासोबत आहे. आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले. आता काटे पहा. गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे. भाजपला गुलाब दिसत होते त्यांना कळेल की माझ्याकडे झाड होते, त्याचे गुलाब तुम्ही नेले आता काटे तुम्हाला बोचतील. पुन्हा नवीन गुलाब फुलवीन या झाडाला नवे गुलाब येतील.’, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांचे नाव न घेता टीका केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -