जयसिंगपूर : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील नंदीवाले वसाहतीमधील चंपाबाई भूपाल ककडे (वय ६५) या महिलेचा साडीने गळा दाबून खून केला होता. त्यानंतर मृत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी (दि.३०) रात्री सुमारे साडे नऊच्या सुमारास घडली होती. त्यानंतर शिरोळ पोलिसांनी तपासासाठी मोठी यंत्रणा लावली असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ७२ तासांत या खुनाचा छडा लावण्यात यश मिळवले. या खून प्रकरणाची प्रकाश लक्ष्मण नंदीवाले (वय ३३) याने पाणी मागून घरात घुसून महिलेचा खून करून दागिने लंपास केल्याची कबुली दिली आहे. हा गुन्हा उघडकीस आणल्याप्रकरणी तपास पथकाला पोलीस अधीक्षक यांच्याकडून १० हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि.३०) रात्री खून करून महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास केल्याच्या घटनेमुळे चिंचवाड परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट देवून शिरोळ पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शिरोळ पोलिसांनी परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांतर्गत रेकॉर्डवरील असलेल्या
गुन्हेगारांची कसून चौकशी सुरू केली होती. मात्र, त्यांना यश मिळत नव्हते.