Saturday, July 5, 2025
Homeकोल्हापूरचंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री?

चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मंत्रिमंडळातील स्थान निश्चित असून, त्यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा कार्यभार राहणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या पाटील यांनी भाजप-सेना युतीच्या काळात कोल्हापूरचे पालकमंत्रिपद सांभाळले आहे. या काळात त्यांच्याकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम, मदत व पुनर्वसन, सहकार, वस्त्रोद्योग, अशी महत्त्वाची खाती होती. 1980 पासून अभाविपचे पूर्णवेळ प्रचारक, 1990 ते 1994 संघटन महासचिव, काश्मीर मोहिमेत त्यांचा सहभाग राहिला आहे. 1994 साली त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरू केले. 1995 ते 1999 पश्चिम महाराष्ट्रात सेवाकार्य, 1999 ते 2004 पूर्णवेळ प्रचारक म्हणून कार्यरत, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे ते सचिव होते. सध्या ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत.



2004 मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. 2008 मध्ये पूणे पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी. त्यानंतर दुसऱ्यांदा याच मतदारसंघातून त्यांना विजय मिळाला. 2016 मध्ये विधान परिषद सभागृह नेता म्हणून भाजपने त्यांच्यावर जबाबदारी दिली. 2019 मध्ये कोथरूड मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधित्व मिळाले. मराठा समाज आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयकमंत्री आदी विविध पदांवर त्यांनी काम करून आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -