कोल्हापूर : भविष्य निर्वाह निधीची रक्कम मंजूर करण्यासाठी ५ हजाराची लाच घेणाऱ्या आरोग्य उपसंचालक कार्यालयातील मुख्य कार्यकारी महिला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकल्या. भावना सुरेश चौधरी असे त्यांचे नाव आहे.
तक्रारदाराची भविष्य निर्वाह निधी रक्कम 6,72,000 रक्कम मंजूर करावयाची होती. या कामासाठी चौधरी यांनी 10 टक्के प्रमाणे 6700 रुपयांची मागणी केली होती. तडजोडी नंतर 5 हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार शरद पोरे, संदीप पडवळ, मयूर देसाई, रुपेश माने यांनी ही कारवाई केली.
पाच हजाराची लाच घेताना आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या मुख्य कार्यकारी महिला अधिकारी जाळ्यात
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -