मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच लष्करातील पदभरतीसाठी अग्निपथ योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत पुरुषांची भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली होती.. पुरुषानंतर आता महिलांनाही या योजनेअंतर्गत भारतीय लष्करात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे..
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत लष्करातील अग्निवीर (महिला) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.. या भरतीची अधिसूचना (Indian Army Agniveer Female Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र महिला उमेदवारांना दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.. या भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
एकूण जागा – 1000 +
या पदासाठी भरती – अग्निवीर (महिला)
शैक्षणिक पात्रता व अनुभव
अग्निवीर महिला मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून इच्छूक उमेदवाराचे दहावीपर्यंत शिक्षण झालेलं असावं..
नोटिफिकेशनमध्ये दिल्यानुसार मार्क्स मिळालेले असावेत.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असावा
पदभरतीच्या सर्व अटी -शर्थी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक
शारीरिक पात्रता
उंची – 162 सेमी
वजन – उंचीनुसार वजन असणं आवश्यक आहे.
भारतीय सैन्याच्या स्टॅंडर्डनुसार वजन व उंची आवश्यक
अशी होईल निवड
शारीरिक कार्यक्षमता चाचणी व शारीरिक मापन चाचणी (पीईटी आणि पीएमटी)
लेखी परीक्षा
दस्ताऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
पगार
पहिले वर्ष : रु. 30,000 /- दरमहा
दुसरे वर्ष : रु. 33,000/- प्रति महिना
तिसरे वर्ष : रु. 36,500 /- प्रति महिना
चौथे वर्ष: रु. 40,000 /- प्रति महिना (4 वर्षानंतर बाहेर पडा : सेवा निधी पॅकेज म्हणून 11.71 लाख रुपये देण्यात येतील)
आवश्यक कागदपत्रं
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (राखीव प्रवर्गासाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2022
ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिकवर करा https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx