Friday, January 30, 2026
Homeकोल्हापूरKolhapur; नोकरीच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या

Kolhapur; नोकरीच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथे नोकरी न मिळाल्याच्या नैराश्यातून युवकाने आपल्या राहत्या घरी दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. भिकाजी बाबूराव पाटील वय ३२ ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची वर्दी विजय मारुती पाटील यांनी पन्हाळा पोलिसात फिर्याद दिली. सदर घटनेची नोंद पन्हाळा पोलीसात झाली आहे. या घटनेमुळे वाघवे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



याबाबत पन्हाळा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी मयत भिकाजी पाटील या तरुणाचे डीएड झाले असून तो नोकरीच्या शोधात होता.त्याच्या शिक्षणाच्या मान्याने त्याला नोकरी मिळत नसल्याने तो सैरभर होता. त्यामुळे त्याने या नैराश्यातून राहत्या घरी माळ्यावर मालवाशास दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. याची वर्दी पन्हाळा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला.त्यानंतर पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेहावर वाघवेत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने वाघवे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्या पश्चात आई,वडील, भाऊ असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -