Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीशिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा खंडित होणार? अद्यापही परवानगी नाही

शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा खंडित होणार? अद्यापही परवानगी नाही

शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजीपार्क येथे होत असतो. मात्र यंदाच्या वेळी शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा मेळावा खंडीत होण्याची चिन्हे आहेत. कारण अद्यापही शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळालेली नाही. शिंदे गटाकडून शिवसेनेचा (Shiv Sena) ‘दसरा मेळावा’ (Dasara Melava) हायजॅक केला जाणार अशा चर्चा सुरु आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटामध्ये दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्क मैदान मिळवण्यावरुन रस्सीखेच सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेकडून (BMC) मेळाव्याला परवानगी मिळावी, यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला आहे. मात्र महापालिकेने अद्यापही परवानगी दिली नसल्याची माहिती आहे.

शिंदे गटाला करायचा आहे दसरा मेळावा

शिवसेनेचे (Shiv Sena News) नेते एकनाथ शिंदेंनी आमदारांनासोबत घेत मोठे बंड केले आणि शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेनेतील अनेक आमदार, खासदार आणि नगरसेवकांना घेऊन ते वेगळे झाले. त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. आता आपलीच शिवसेना खरी असा शिंदे गटाकडून केला जात आहेत. यासाठीच आता शिवसेनेची शिवाजीपार्क येथील दसरा मेळाव्याची (Dasara Melava News) परंपरा शिंदे गटाला पूर्ण करायची आहे. यामुळे या दिवशी उद्धव ठाकरेंऐवजी एकनाथ शिंदेंना मेळावा घ्यायचा आहे. यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु झालेली आहे. दादरला दसरा मेळावा घेऊन आपणच खरी शिवसेना आहोत असे शिंदे गटाला दाखवून द्यायचे आहे. यासोबतच मनपा निवडणुका देखील तोंडावर आहेत. येथूनच त्यांना मनपा निवडणुकांचे रणशिंग फुंगायचे आहे. आता दसऱ्याच्या दिवशी शिवाजीपार्क कोणाला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दसरा मेळावा शिवाजी पार्कातच घेणार – उद्धव ठाकरे

दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेता आला नव्हता. अशा वेळी यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कातच होणार असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगितले होते. शिवसेनेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात त्यांनी याविषयावर भाष्य केले होते. कारण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना निर्बंध होते. यावेळी कोणतेही निर्बंध नाहीत. अशा वेळी शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट पूर्ण प्रयत्न करेल.

शिवसेनेला अद्याप मिळालेली नाही परवानगी

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला अद्यापत परवानगी मिळाली नसल्याची माहिती आहे. परवानगी मिळवण्यासाठी शिवसेनेकडून मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. मात्र अद्याप शिवसेनेला परवानगी मिळालेली नाही. दुसरीकडे दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट देखील सक्रिय झाला आहे. शिंदे गटाकडून शिवसेना पक्ष, पक्षांच्या चिन्हांवर देखील दावा केला जात आहे. अशा वेळी शिंदे गट शिवसेनेचा दसरा मिळावा देखील आपल्या ताब्यात घेणार का याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -