Monday, July 7, 2025
Homeअध्यात्महरितालिकेच्या पूजेत समाविष्ट करा या वस्तू, जाणून घ्या पूजा साहित्य आणि विधी

हरितालिकेच्या पूजेत समाविष्ट करा या वस्तू, जाणून घ्या पूजा साहित्य आणि विधी

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीयाला हरितालिका तृतीया साजरी केली जाते. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवतात. यावर्षी हरितालिका तृतीया मंगळवारी 30 सप्टेंबर रोजी (Hartalika Trutiya 2022 Date) साजरी केली जात आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये, हरितालिका तृतीया गौरी हब्बा म्हणून साजरी केली जाते आणि माता गौरीचे आशीर्वाद (Hartalika Trutiya Pooja Sahitya) घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण दिवस म्हणून पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया दिवसभर निर्जळी उपवास करतात.

सर्वप्रथम हे व्रत माता पार्वतीने भगवान शंकरासाठी ठेवले होते. त्यामुळे जर तुम्हीही हरितालिका तृतीयाचे व्रत करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी पूजेच्या साहित्यात समाविष्ट कराव्या (Festival 2022) लागतील. त्याशिवाय हरितालिका तृतीयाची पूजा अपूर्ण मानली जाते. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊयात.

हरितालिका तृतीया पूजेचे साहित्य

ओली काळी माती किंवा वाळू, बेलपत्र, केळीचे पान, धोत्र्याचे फळ आणि फूल, मंजरी, जानवं, वस्त्र, फळ, नारळ, कलश, तूप, तेल, कापूर, कुंकू, दिवा, सिंदूर, सौभाग्याचे साहित्य इत्यादी वस्तूंचा हरितालिकेच्या पूजेत समावेश करावा.

हरितालिकेची पूजाविधी

हरितालिका व्रत कुमारिका आणि विवाहित स्त्रिया करतात. कुमारिका चांगला पती मिळावा यासाठी तर विवाहित स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि संसार सुखाचा व्हावा यासाठी हे व्रत करतात. या दिवशी सकाळी सर्व विधी आटोपल्यानंतर हरितालिका व्रताचा संकल्प करावा. पार्वती आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची चौरंगावर स्थापना करावी. या दिवशी वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली जाते. षोडशोपचार पूजा करून हरतालिकेसाठी हिरव्या बांगड्या वाहिल्या जातात आणि विविध प्रकारच्या झाडांची पाने अर्पण केली जातात. या दिवशी दिवसभर कडक उपवास केला जातो. फळांचा नैवेद्य दाखवून देवीची आरती केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आरती करून नैवेद्य दाखवला जातो. यानंतर मूर्तींचं विसर्जन करून व्रत पारण केले जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -