Monday, July 7, 2025
Homeअध्यात्मआज आहे हरितालिका तृतीया, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

आज आहे हरितालिका तृतीया, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी



हरितालिका तृतीयेला हिंदू धर्मात अत्यंत महत्व आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक जीवनात आनंदासाठी उपवास आणि पूजा करतात. भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हे व्रत पाळले जाते. या दिवशी स्त्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी निर्जला व्रत करतात. भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली असून आज हरितालिका तृतीया साजरी केली जात आहे. जाणून घेऊया आजचे शुभ मुहूर्त आणि पूजा विधी.

हरितालिका तृतीया शुभ मुहूर्त
भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरितालिका तृतीया साजरी केली जाते. यावेळी ही तारीख 29 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 3:20 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 30 ऑगस्ट रोजी दुपारी 3:34 वाजता संपेल. उदयतिथीनुसार हरतालिका तृतीयाचे व्रत 30 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज ठेवण्यात येणार आहे. सकाळी 6.34 ते 8.50 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल.

हरितालिका तृतीया पूजा साहित्य
हरितालिका तृतीयेची पूजा करताना पूजा साहित्याची विशेष काळजी घ्यावी. हरितालिकेच्या पूजेत सुके खोबरे, कलश, बेलपत्र, शमीचे पान, केळीचे पान, धतुरा फळ, तूप, मध, अबीर, चंदन, मंजरी, कलव, अत्तर, पाच प्रकारची फळे, सुपारी, अक्षता, धूप, दीप, आक चे फुल, कापूर, कुंकू, गंगाजल, श्री गणेशाला अर्पण करण्यासाठी दुर्वा, जानवे आणि सिंदूर यां वस्तूंचा समावेश असावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -